Ad will apear here
Next
‘कॅन्सर केअर’ला वैद्यकीय उपकरणे भेट
पुणे : कर्करोगावर मोफत उपचार करणाऱ्या कॅन्सर केअर सेंटरला रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन यांच्याकडून वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली.

केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या विश्रांती कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर सेंटर आणि मातृसेवा डायग्नोस्टिक सेंटरमधील गरजू कॅन्सर रुग्णांसाठी पेशंट ट्रॉली, लिम्फडेमा पंप, एक्झामिनेशन कोच (तपासणी पलंग) या उपकरणांची भेट देण्यात आली.

भवानी पेठमधील विश्रांती कॅन्सर केअर सेंटरमध्ये ही उपकरणे ‘रोटरी’चे सहाय्यक प्रांतपाल चंद्रशेखर यार्दी, रोटरी क्लब पुणे गांधीभवनचे अध्यक्ष गणेश जाधव यांच्या हस्ते सेंटरचे संस्थापक विश्वस्त कर्नल (निवृत्त) एन. एस. न्यायपती, डॉ. अशोक सुमंत यांना सुपूर्द करण्यात आली. कर्करोग रुग्णांना मोफत सेवा देणाऱ्या संस्थेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे

या वेळी ‘रोटरी’चे प्रकल्प संचालक गिरीश मठकर, प्रकाश भट, शैलेश गांधी उपस्थित होते. देणगीदार आणि अभीर फाउंडेशनचे विश्वस्त शेखर रेगे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. या प्रकल्पास प्रकाश भट आणि अभीर फाऊंडेशनचे शेखर रेगे यांचे सहकार्य लाभले.

केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या विश्रांती कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर सेंटर आणि मातृसेवा डायग्नोस्टिक सेंटरमधील गरजू कॅन्सर रुग्णांसाठी मोफत सेवा देते. यामध्ये रुग्णास प्रवेश देणे, मोफत तपासणी, २४ तास नर्सिंग आणि सहायक काळजी घेणे, आहार, रुग्णाचा मुक्काम, मार्गदर्शन आणि सल्ला या सुविधा मोफत पुरविल्या जातात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZQLBI
Similar Posts
रोटरीचे व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार पुणे : ‘रोटरी क्लब ऑफ पुणे, गांधी भवन’ तर्फे २०१८ या वर्षासाठीचे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार’ (व्होकेशनल एक्सलेन्स अॅवॉर्ड ) १८ मार्च रोजी प्रदान करण्यात आले.
‘रोटरी क्लब गांधीभवन’चे पुरस्कार जाहीर पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन यांच्यातर्फे दिले जाणारे ‘व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार २०१८’ (व्होकेशनल एक्सलेन्स अ‍ॅवॉर्ड) जाहीर करण्यात आले आहेत. या वर्षीचा हा पुरस्कार शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरीबद्दल अपूर्वा पालकर, मानसशास्त्रज्ञ शामला वनारसे आणि दृष्टीहीन प्रज्ञाचक्षू व्यक्तींसाठी कार्यरत असणाऱ्या मीरा बडवे यांना दिला जाणार आहे
‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे ​रविवारी उद्घाटन पुणे : रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन, पुणे महानगरपालिका, सस्टेनॅबिलीटी इनिशिएटीव्ह, सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रीएटेड सोल्यूशन्स, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ आणि गंगोत्री ग्रीन बिल्ड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ग्रीन सोसायटी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील गृह संस्था व पुणेकरांना या स्पर्धेत सहभागी होता येत येणार आहे
गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी पुण्यात पहिले पाऊल पुणे : पुण्यातील जुन्या इमारतींच्या, गृहनिर्माण संस्थांच्या स्वयं पुनर्विकासासाठी गंगोत्री ग्रीनबिल्ड या संस्थेकडून ‘टुगेदर वी बिल्ड’ ही व्यावसायिक सल्ला सेवा सुरू करण्यात आली आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language